Monday, February 7, 2011

माझ्या मराठीचीये कौतुके अमृताते पैजा जिंके

आपल्या सर्वांच्या भावनांचा आदर करून मराठीत पहिला वहिला ब्लॉग लिहिण्याचा हा माझा प्रयत्न चू. भू. समजून घ्यावी.

शाळेत जाताना आपण ठरवून जात नाही की आज मी असे करणार.  पण आपल्या जीवनात नक्कीच तसे वागतो. आपली जी ट्रिप झाली त्या दिवशी  खूप दिवसानी काहीही  न ठरवता एक मजेदार दिवस तुम्हा सर्वां बरोबर घालवता आला. एकमेकांची  यथेच्छ भंबेरी उडवत जुन्या दिवसांची आठव
  आपण मनात ताजी  केलीत . आपले मास्तर आणि बाई,  एकेकाची मजा ऐकताना आजचे सगळे विसरायला झाले.  


मित्राना खरे तर धन्यवाद् करुच नये ही आपली परम्परा, कारण निव्वळ किंवा निखळ आनंद आज प्रत्येक जण शोधत असतो. सर्व मित्रा बरोबर तो मिळाला.


तुम्हा सर्वासांठी एक जुनी कविता - विंदा करंदीकरांची -  देणार्‍याने देत जावे


देणार्‍याने देत जावे,
घेणा्र्‍याने घेत जावे.

हिरव्यापिवळ्या माळावरुन
हिरवीपिवळी शाल घ्यावी;
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.

वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे.

उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्याशा भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी.

देणार्‍याने देत जावे;
घेणार्‍याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस
देणार्‍याचे हात घ्यावे !

विंदा करंदीकर



मला ही कविता पुन्हा वाचायला मिळाली, एक पुस्तकातून त्याचे नाव - एक होता बिल्डर - डॉ. सुधीर निर्गुड़कर. ही कविता तुम्हा सर्वा समोर ठेवण्याचे कारण आज आपण समाज व देशा कडून काहीना काही स्वरूपात घेतो आहेच. मग ते घेणार्‍याने कधी तरी देणार्‍याच्या भूमिकेत शिरावे ही माफक अपेक्षा. 


काहीतरी देण्याचा यापुढे नक्कीच प्रयत्न करीन........