Wednesday, March 9, 2011

हाळी

गाडी चालवताना हाळी हा शब्द सुचला आणि सुरू झाले विचारचक्र जे आज येथे येऊन थांबले. आणि शब्दांचा प्रवाह वाहू लागला.

हाळी खरतर गावात गेलात कुणाला विचारल अमुक तमुक गाव किती लांब आहे हे काय हाळीच्या अंतरावर म्हणजे किती माहीत नाही. एखाद्याची हाक जाते मैलभर मग काय करायचे अशी ही गंमत. तर पुन्हा एकदा आमच्या मित्राना आम्ही हाक दिली आणि या वेळी ती भरभरून साद मिळाली. मजा येते हा खेळ खेळायला. खरी इच्छा आमचा मित्र चंद्रशेखर गोखलेची पण काही घरगुती जबाबदारी मुळे तोच येऊ शकला नाही.   आमचे मित्र सारंग शिंदे, अविनाश पारे, धनंजय दिक्षित, योगेश नाडकर्णी, विनीत गोगटे, अमित आवटे, प्रशांत काकडे (बिचारा मॅच साठी येणार नाही म्हणत होता), सदाबहार संदीप बोंदार्डे व बाकी सगळे आमचे नेहमीचेच उस्फुर्त कार्यकर्ते.

नेहमी प्रमाणे धमाल केली मॅच पण एन्जॉय केली. ज्याला जे आवडते ते त्यांनी खाल्ल. पण भेटीची मजाच निराळी कारण दर वेळी नवीन मित्र आठवणीच्या जुन्या पोतडीतून काही तरी नवीन आठवणी काढतात आणि धमाल चालूच राहते. कोणी कुठे मार खाल्ला व दिला एकूण गमती जमति.

आज सकाळी उठून अजय अतुल चे मोरया ऐकल व आठवण आली अरे ही पण हाक आहे देवाला मनापासून मारलेली. काय आहे आपण देवळात जातो काहीतरी मागतो पण खरच कधी विचार केला आहे का? जा देवळात आणि म्हणा देवाला आलो होतो तुला फक्त भेटायला प्रेमापोटी. ही भेट असु द्या सुदामाच्या प्रेमाची कृष्णाला दिलेली, मग बघा गंमत.

हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया
तुझ्या इना माणसाचा जन्म जाई वाया
हे देवा दिली हाक उद्द्धार कराया
 आभाळाची छाया तुझी समिंदरची माया

हे छोटसच कडव मला फार अर्थपूर्ण वाटल व त्यातली तळमळ थेट हृदयापर्यंत पोहोचली. हीच भेटीची तळमळ आपल्या पुढील भेटीत कायम राहो ही मोरया चरणी प्रार्थना.