Monday, July 11, 2011

विठ्ठल - सगळ्या जगाचा हरी


शब्द जिथे संपतात आणि सुरू होतात फक्त प्रेमाच्या अश्रूंचे अभिषेक. अशी ती विठाई आज कल्पतरू प्रमाणे सगळ्या भक्तांवर नव्हे मुलांवर आईच्या प्रेमाचा वर्षाव करत राहणार. जिथे भक्तांचे नाते संपते आणि आई मुलाचे नाते सुरू होते तिथला मायेचा उमाळा हा अंतरीचा न संपणारा झरा आहे. त्याच्या प्रेमात न्हाय ल्यानंतर जगातील कोणतीही गोष्ट गौणच वाटते.

त्या सावळ्या विठ्ठला चे ते सुंदर रूप डोळ्यात साठवत परतताना माहेरहून निघालेल्या माहेरवाशिणीच दुख अनुभवायाला मिळत. ते सुंदर ध्यान आजही शब्दातीत आहे.

No comments:

Post a Comment