Saturday, April 2, 2011

अगा मी केला अट्टहास.


Sachin Tendulkar and Gautam Gambhir walk with the trophy An emotional Yuvraj Singh is embraced by Suresh Raina(

(source : www.cricinfo.com)

अगा मी केला अट्टहास
  

एखाद्याने स्वप्न पहावे आणि टीम ने त्याला मदत करावी असा आजचा वर्ल्ड कपचा सामना. सचिन तेंडुलकर - भारतीय क्रिकेट च एक सुंदर स्वप्न. २१ वर्ष क्रिकेट खेळल्यावर वर्ल्ड कप ची ती आस आज पूर्ण झाली. माणूस स्वप्न पाहतो नी त्याच्या मागे लागतो कित्येक स्वप्न दिवा स्वप्नासारखी विसरूनही जातो. पण हे स्वप्न नव्हते तो होता एक ध्यास,झपाटलेपण.

मॅच संपली आणि एक हृद्य कार्यक्रम पाहायला मिळाला. तो म्हणजे सर्व खेळाडू गळ्यात पडून रडतात. खरच प्रेम असेही असतच की.
जिवाला जीव देणारे मित्र दे देवा 
प्रेमाचा ओलावा सांभाळणारे दे देवा
तुझ्या सारखाच सखा दे देवा
नव्हे तूच माझा सखा हो देवा.

सचिन - क्रिकेट चा देव आमच्या पिढीत जन्माला आला त्याने आम्हाला भरपूर मनोरंजन केले.


आभार मानू तर तू दुखावशील 
जगण्याच्या या लढाईत दिलास आम्हाला आधार
पुन्हा जीवनाच्या पिचवर पुन्हा उभा राहण्यासाठी.
तरी मित्रा, तुझे मनापासून नव्हे हृदयापासून आभार.

सगळ्या वर्ल्ड कपच्या खपल्या या वर्ल्ड कपला भरून निघाल्या. १९९६,२००३,२००७ कसे विसरायचे सगळे. आमचा लकी व हुशार कॅप्टन धोणी चे आभार दोन वर्ल्ड कप चा - २०-२० चा व आजचा.

तर डेक्कन ना ला जाऊन मनसोक्त नाचलो. ०२/०४/२०११ - आठवणी च्या कप्प्यातला नाजूक दिवस. काय पोर रस्त्यावर उतरून धिंगाणा घालत होती.


पुन्हा जगायला उभारी आली 
आजच्या दिसाने नवी दिशा दिली
कूनाला काय भेटल काय करायच
आम्हाला आमची दिशा मिळाली.


आजच्या दिसाला ठेवीन जपून
माझ्या नातवाला सांगीन लेका तुझा आजा 


पण नाचला व्हता जवा तेंडुलकरला वर्ल्ड कप मिळाला व्हता.



2 comments:

  1. Svthete Says :::: Bas bas ... Mahya amchya uttarpatriketil uttar hyapeksha veglae nahiye.

    ReplyDelete